समजत नाही कि, लोकांना वस्तुस्थिती मान्य का नसते..?.
आज तीर्थक्षेत्रांवरचा चाललेला गोंधळ जर कोणी दाखवला
तर लोक त्याला विरोध करून म्हणतात कि, नाही ती आपली संस्कृती आहे. आपला धर्म
आपल्याला शिकवतो कि, तीर्थक्षेत्रांवर दान धर्म करावा. पण हे सर्व आपण नाही बोलत असतो
हे बोलणाऱ्यांनी लक्षात असू द्या. तर हे लहान पणापासून आपल्या मनावर झालेले संस्कार
बोलत असतात. आज तीर्थक्षेत्रांवर श्रद्धेचा फक्त लिलाव चालू आहे आणि हि वस्तुस्थिती आहे. कधीतरी सर्वे करा, तुम्हाला दिसून येईल कि, तीर्थक्षेत्रांवर असलेल्या पुजाऱ्यांची आज करोडो रुपयाची मालमत्ता आहे.
अलीकडचीच घटना आहे कि तिरुपती तीर्थक्षेत्राला
केसांच्या लिलावातून ७० कोटीचा फायदा झाला (हे वृत्त सकाळ वृत्तपत्रातून समोर
आलेलं वृत्त आहे माझ्या मनाचं नाही.). आम्ही तिरुपतीला जाऊन श्रद्धेने केस दान करतो आणि त्या
श्रद्धेचा हे लोक लिलाव करतात काय म्हणावं ह्या सर्व गोष्टीला…?. श्रद्धेचा लिलाव कि लिलाव झालेली श्रद्धा..?.
शिर्डी ज्या साईबाबांनी आपलं आयुष्य हे समाज
सुधारणेकरिता, समाज प्रबोधनाकरिता व गोर गरीब जन माणसांकरिता खर्च केले त्याच साईबाबांना आम्ही सोन्याच
मुकुट चढवतो, लाखो रुपयाच्या दागिन्यांनी
मढवतो आणि दर्शनाचे V.I.P तिकीट ठेवतो ह्या सर्व घटनेला काय
म्हणावे…?.
एकीकडे आई बापाला वृद्ध आश्रमाच्या वाटा
दाखवणारे गबाळ दुसरीकडे देवावर अथांग श्रद्धा असल्याचा गाजावाजा करतात आणि हिंदू
संस्कृतीचा इतिहास सांगतात. ज्या हिंदू संस्कृतीचा आणि देव ह्या संकल्पनेचा
पाया असलेले आई बाप आम्ही नीट सांभाळू शकत नाही तर देव हा शब्द उच्चारण्याचा
आम्हाला तीळ मात्र अधिकार नाही हे पहिले लक्षात असु द्या. जगात पहिला गुरूचा मान
हा आई बापाला आहे हे ध्यानात असू द्या.
आजच्या धकाधकीच्या, स्वार्थी जगात कसली आली
श्रद्धा. आपणच एकदा एकांतात विचार करा कि, आपण खरच देवाला अनन्यभावाने शरण येतो का…?. कि, स्वार्थीपोटी देवाला
भजतोय...?. रात्री दारू पिऊन आलेला माणूस दुसऱ्या दिवशी
सकाळी ताजातवाना होऊन देवाला भजतो हि कुठली आली श्रद्धा…?. आई बापाला शिव्या घालणारा आणि आई बापाला घरातून
हुसकावून लावणारा माणूस देवाला भजतो हि कुठली आली श्रद्धा…?. वेळप्रसंगी आई बापाला सुद्धा मारणारा माणूस
देवाच्या गाभाऱ्यात जाऊन देवाला भजतो हि कुठली आली श्रद्धा..?. ह्या सर्व प्रश्नांचा एकदा विचार करा .
ते इंग्रज भारतासमोर पाव वाटा सुद्धा नसणारा
त्यांचा देश पण सुपीक विचारांच्या आणि सुलभ बुद्धीच्या वापरावर त्यांनी
भारतासारख्या विशाल देशावर १५० वर्ष राज्य केले हा सर्वात मोठा पुरावा आहे सुपीक
विचारांचा आणि सुपीक बुद्धीचा. जर त्यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय जोतिषाच्या
हातात किंवा देवाच्या पायावर सोडले असते तर हे सर्व शक्य झाले नसते. आज त्या
गोऱ्या वर्णीय लोकांच साम्राज्य जगभर पसरलं आहे ते फक्त सुपीक विचारांच्या जोरावरच
.
पण भारतासारखा विशाल क्षेत्रफळ असलेला देश मात्र
अंधश्रद्धेचा व जोतिषांचा बळी ठरला आहे. श्रद्धा ठेऊ नये असं अजिबात नाही
शिवाय भारताच्या राज्यघटनेत श्रद्धा ठेवण्याचा व असण्याचा प्रत्येकाला स्वतंत्र
अधिकार आहे.
शेवटी एकच सांगतो मी सुद्धा हिंदू आहे व मी माझ्याच धर्माबद्दल बोलू शकतो. कारण दुसऱ्याचं घर स्वच्छ करून स्वतःच्या घरात पसारा ठेवण्यात काही एक अर्थ नसतो म्हणून पहिले स्वतःच घर स्वच्छ करतो आहे. शिवाय माझा कोणालाही विरोध नाही तर
वस्तुस्थिती दाखवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तीर्थक्षेत्रांवर पैशांचा ढीग
रचण्यापेक्षा आणि पुजाऱ्यांची तिजोरी भरण्यापेक्षा तोच पैसा सत्कर्मासाठी वापरा,
चांगल्या कार्यासाठी वापरा, अनाथ आश्रमात अनाथ मुलांकरिता वापरा, गोरगरीबांच्या
पोटासाठी वापरा देव तुम्हाला माणसातच मिळेल.
विश्वास ठेऊ नका पण विचार मात्र नक्की करा. आवड
आपलीच आणि निवड सुद्धा आपलीच. पटलं तर स्वीकारा नाहीतर पूर्णविराम घ्यावा
कुठलाही आग्रह नाही.
..ණ मनोज गुजर दि– २५/०६/२०१३