आम्ही खूप अभीमानाने म्हणतो कि, "राजे पुन्हा
जन्माला या" पण इथे जिजाऊ तरी कुठे जन्मली आहे तर, राजे जन्माला येतील. आजच्या मराठ मोळ्या मुली आता पहिल्या सारख्या
राहिल्यात तरी कुठं तर, जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आजच्या मराठ मोळ्या मुलींना नट नट्यांचा इतका नशा
चढलाय कि, त्या मराठ मोळ्या मुली नट नट्यांचा धुंदीत आमचा इतिहास विकायला निघाल्या आहेत. आजच्या मराठ
मोळ्या मुलीला ऐश्वर्याचं पूर्ण नाव ठाऊक असतं शिवाय ऐश्वर्याच्या मुलीचा जन्मदिवस ह्या
नोंद करून ठेवतात.
पण त्यांना आई जिजाऊचा जन्मदिवस ठाऊक नसतो. ते तर
सोडाच त्यांना जर शिवरायांच पूर्ण नाव विचारलं तर त्या एकमेकांच्या तोंडाकडे पाहत
हसत म्हणतात “जा रे इतकं नाही माहित” तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आई जिजाऊ स्वराज्याला सौभाग्य आणि सौभाग्याला स्वराज्य मानायच्या. पण आजची मराठ मोळी मुलगी प्रियकराला सर्वस्व आणि सौभाग्य मानते तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आई जिजाऊने भाळावर कुंकू लाऊन त्याला जपायचे कसे हा कान मंत्र स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला दिला. पण अजची मराठ मोळी मुलगी समाजात सावत्र भाळ असल्यागत वावरत आहे तर, ती कुठून स्वत:चे रक्षण करणार व कुठून तिचं कुंकू जपणार तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आई जिजाऊनी स्वाभिमान आणि स्वराज्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे प्रत्येक स्त्रीच्या मनात कोरून दिले होते. पण आजची मराठ मोळी मुलगी ते नाणंच हरवून बसलीये तर तिला कुठून राहणार स्वाभिमान तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आई जिजाऊ यांनी शत्रूला डोळ्यात कसे बसवायचे आणि त्याला त्याची जागा कशी दाखवायची याचं शीक्षण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला बहाल केले होते. पण आजची मराठ मोळी मुलगी शत्रूचा काटा काढण्यासाठी प्रियकराची मदत घेतेय तर ती काय दाखवणार शत्रूला त्याची जागा तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आई जिजाऊ शिवरायांना गडकाठी नेऊन स्वराज्याचा विस्तार दाखवायची व सोनेरी स्वराज्य उभारण्याची स्वप्न रंगवायची. पण आजची आजची मराठ मोळी मुलगी समुद्रकाठी प्रियकराचा हातात हात घेऊन प्रेमाचा विस्तार वाढवत व प्रेमाची स्वप्न रंगवत बसली आहे तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आई जिजाऊने संपूर्ण आयुष्य संस्कार देण्यात व स्वराज्य घडविण्यात खर्ची घातले ते केवळ आम्हाला ताठ मानेने जगण्याचा वसा मिळावा म्हणून. पण आजच्या मराठ मोळ्या मुली आई जिजाऊचे हे अथांग उपकार कधीच विसरल्या आहेत तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
आजची मराठ मोळी मुलगी पाश्च्यात्य संस्कृतीचा
इतका अवलंब करतेय कि, तीला भान नाही तिच्या अब्रूची, तिला भान नाही आपल्या जातीची, तिला भान नाही आपल्या
कुळाची, तिला भान नाही आपल्या संस्कृतीची तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
तर आजच्या मराठ मोळ्या मुलींना एकच विनंती
करतो कि, आपल्या जातीचं, कुळाचं, संस्कृतीचं भान ठेवा. राजे शिवरायांचं, आई जिजाऊचं अस्तित्व नेहमी जागृत
ठेवा. तरच समाजात आई जिजाऊ घडेल आणि पुन्हा राजे जन्माला येतील.
..ණ मनोज
गुजर