Saturday, 8 February 2014

विचार ४२


"नातेवाईकच" "नातेवाईट" करत असतात.

.. मनोज गुजर 

विचार ४१


कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला जास्त महत्व द्यावे.

.. मनोज गुजर 

विचार ४०


मानवाला जन्मजात अवगत नसलेले पण मानव निर्मित व मानवाने मरेपरीयंत टिकवलेले अलंकार म्हणजे द्वेष, मत्सर, क्रोध व अहंकार होय.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज  दि /०२/२०१४

विचार ३९


वाणी मधुर असली तर ती वीणा होते आणि असुर असली तर मनावर व्रण आणते.

.. मनोज गुजर 

स्त्री हि एक अदभूत, दिव्य शक्ती आहे.


स्त्री हि एक अदभूत, दिव्य शक्ती आहे. तिच्या उदरातून विश्व निर्मिती होते, ह्या पृथ्वीला चालविणारा, ह्या पृथ्वीतलावर साम्राज्य गाजविणारा माणूस स्त्रीच्या उदरातुनच प्रकटला व प्रकटतो हे लक्षात असू द्या. जे आजवर महान योध्ये झाले, जे महान पुरुष झाले, ज्यांनी जगाला जिंकले, ज्यांनी जगाच्या पाठीवर राज्य केले, ज्यांच्या पराक्रमापुढे संपूर्ण विश्व झुकले असल्या सर्व थोर व्यक्तींचा जन्म स्त्रीच्या उदरातुनच झाला आहे व आजवर जे व्यक्ती महान समजले जातात व यापुढेही जे व्यक्ती महान होतील ते सर्व स्त्री शक्तीमुळेच हे मात्र विसरू नये.

स्त्रीला माऊली म्हणतात कारण ती माफ करते, तिला आई म्हणतात कारण तिला मातृत्व दिले आहे. संपूर्ण विश्वात फक्त एकच व्यक्ती आहे जी निस्वार्थीपणे तिच्या उदारातली उर्जा विश्वाला बहाल करते ती म्हणजे स्त्री. बाळाला घास भरविणारी, बोट धरून चालायला शिकविणारी, बोटात लेखणी धरून लिहायला शिकविणारी, मुखातून बोल फुटायला लावणारी ती एकमेव स्त्रीच आहे. तिच्या अथांग त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे असंख्य योध्ये, महामानव ह्या विश्वात निर्माण होतात.

स्त्री शक्तीचा नेहमी आदर करा, तिच्यावर कुठलाही अत्याचार करू नका, तिच्या भावनांची कदर करा, तिला नेहमी वंदन करा.

स्त्री शक्तीला कोटी कोटी प्रणाम.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज  दि /०२/२०१४