धावतं युग, धावत्या युगात झपाट्याने व दररोज होणारे बदल, प्रत्येक गोष्टीत
अत्याधुनिकता हे सर्व काही आज आम्ही स्वीकारतो आहे व हे बदल स्वीकार करणाऱ्यालाच
ह्या युगात वावरता येईल हेही तितकेच सत्य आहे. इथे सर्व काही बदलत आहे पण मनुष्य
मात्र तसाच आहे हि वस्तुस्थिती आहे. ह्या युगात प्रत्येक गोष्टीत बदल करणे खूप
सोपं आहे. पण जगातील सर्वात मोठा व सर्वात कठीण बदल म्हणजे “माणसात होणारा बदल”.
आज प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसात बदल घडवण्यात व्यस्त आहे व दुसरा मनुष्य
आपल्यात. पण ह्या लपंडावात ना आपल्या काही हाती लागते, ना दुसऱ्या मनुष्याच्या हाती काही येते. यातून फक्त एकच निष्कर्ष हाती येतो तो म्हणजे “मौल्यवान वेळ व शक्ती खर्च होणे” (वेस्ट ऑफ टाईम अँड वेस्ट ऑफ एनर्जी).
ते म्हणतात ना “सुंदर पोशाख करून विद्वान दिसणं खूप सोपं आहे पण सुदर पोशाख करून विद्वान बनणं खूप कठीण आहे” आमची सुद्धा अशीच
गत झाली आहे. आम्ही जेव्हा समूहामध्ये असतो तेव्हा खूप विद्वान असल्याचे भासवतो व
जेव्हा घरात असतो तेव्हा आपला मुळं स्वभाव दाखवतो.
तर आजपासून पहिले स्वतःत बदल घडवू, पहिले स्वतः बदलू व नंतर दुसऱ्यांना बदलवू.
आपणच आपल्या जीवनात आपले आदर्श व प्रेरणास्थान होऊ.
(टीप – हा बदल मी पहिले माझ्यात करायला सुरुवात केली आहे.)