हा लेख फक्त वाचू नका तर
त्यातून बदल घडावा हा हट्ट नक्कीच बाळगला आहे. (मी माझ्यात हा बदल केला आहे तुम्ही
सुद्धा करा.)
बंधुंनो…..माझ्या माता–भगिनिंनो मुक्या प्राण्यांवर कधीही अत्याचार करू नका शिवाय मुक्या
प्राण्यांच्या जीवाला जपा. मुक्या प्राण्यांच्या अबोल वाणीला काळजातून जपा व समजून
घ्या. आम्ही मुक्या प्राण्याच्या
शिजवलेल्या मासात आमचा जीव ओतत आहोत, मटन, चिकन चा बाजार घालत आहोत. शिवाय कुठलाही विचार न
करता मुक्या प्राण्यांचा बळी घेत आहोत. आपल्याला साधा ताप जरी आला तरी आपण थंडीने
कापत असतो पण इथे तर आम्ही उघड्या डोळ्यांनी मुक्या प्राण्यांचा जीव जातांना पाहत
असतो. आमचं काळीज दगडाहून बेहत्तर
झालं आहे. मानवता हाच खरा धर्म जाणणारे आम्ही, त्याच धर्माला विसरलो आहोत. आमचा जीव मुक्या प्राण्यांच्या शिजवलेल्या रसरशीत
रस्यात आहे. अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणणारे आम्ही, ताटाला नमस्कार करूनच घास तोंडात घालायचो. पण चिकन, मटन खाणारे आम्ही अन्नाच्या घासाला तोंडात घालण्यापूर्वी स्वतःच्या
ताटाला नमस्कार तरी कसे करू शकतो..?. मटणाच्या गाड्यांवर लाईन लाऊन कलेजा दे, वझडी दे असं मागणारे आम्ही कसे काय स्वतःच्या ताटाला
नमस्कार करू शकतो..?. स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून ५० किलोमीटर तोंडात मटणाची लाळ
घेवून जाणारे, मटणासाठी हपापलेले आम्ही कसे काय स्वतःच्या ताटाला नमस्कार करू शकतो..?.
अरे मानवा तुला कोणी
सांगायचं तुझ्या पोटात जाणारा मटन, चिकन नावाच्या पदार्थाला पचायला ७२ तास लागतात. मटन, चिकन खात असतांना ४-५ व्या घासाला आतला परमेश्वर सांगत असतो
नको खाऊ तरी आपण खात असतो. आतला परमेश्वरच्या मनाविरुद्द वागतो म्हणून तो पहिली
नोटीस म्हणून नाकावर दवबिंदू आणतो तरी आपण नाक पुसत खातच असतो. पुन्हा तो नाकात
शेंबूड आणतो तरी आपण नाक शिकरत खात असतो. आपण इतके एकाग्र झालेलो असतो कि ती मटणाची
नळी इथे आपट तिथे आपट आणि त्यातून छोटासा गुल तोंडात पडला कि विश्व जिंकण्याचा
आनंद होतो.
आमच्या माता–भगिनी तर खूप आवडीने मुक्या
प्राण्यांच्या शिजवलेल्या मासाला स्वीकारत असतात. अग तुला निर्मात्याने आईच काळीज
दिलंय आणि तूच मुक्या प्राण्याच्या मासाला आवडीने स्वीकारतेस. तुला स्त्री जन्म
मिळाला आहे. तुला आईपण दिल आहे. तुझ्या पोटी सुद्धा जगातलं सुंदर बाळ जन्म घेणार आहे.
तुला सुद्धा आई च्या वेदना कळणार आहे. तुला सुद्धा तुझ्या मुलाच दुखं पाहिलं जाणार
नाहीये. तुला अभिमानाने माता म्हणतात. तुला माऊली म्हणतात. जी माफ करते ती माऊली
आणि तूच मुक्या जीवाला आवडीने खातेस. अग मुक्या प्राण्यांवर दया कर, प्रेम कर, त्यांच्या
भावनांना समजून घे, त्यांच्या अबोल वाणीला काळजातून जप, मग पहा ह्या स्वार्थी जगात आईपण पुन्हा जन्माला
येईल.
बंधुंनो...माता–भगिनिंनो जरा विचार करा मुक्या
प्राण्याच्या जीवाला शिजवत असतांना त्याला किती वेदना होत असतील. त्याच्या
आत्म्यातून किती दुख सांडत असेल शिवाय त्यांच्या आत्म्यातून आपल्याला किती शाप मिळत असतील.
बंधुंनो...माता
– भगिनींनो, आजपासून आपण मुक्या प्राणी मात्रावर
प्रेम करून, त्यांच्या हत्तेपासून संरक्षण करून, त्यांना सुद्धा त्यांच स्वतंत्र जीवन
जगू देऊ. हे सुंदर कार्य करून माणूस म्हणून जन्माला आल्याच आणि जगात माणुसकी
असल्याच समाजाला पटवून देऊ.
(हा संदेश सर्व जाती धर्मासाठी आहे. योग्य वाटत
असेल तर नक्कीच विचार करा आणि माणूस म्हणून जन्मला आलो आहे हे सिद्ध करा.)
जे पेराल तेच उगवेल ह्या वाक्यावर
विचार अवश्य करा.
जरा हे चित्र पहा आणि स्वतःच्या मनाला प्रश्न करा
कि, आपण आपल्या जिभेचे चोसले पुरविण्याकरीता मुक्या प्राण्यांचा जीव घेत आहोत
ते योग्य आहे कि अयोग्य..?
..ණ मनोज गुजर
