Sunday, 7 September 2014

विचार ४९.

सर्व माणसांना दोन हात, दोन पाय व एक डोकं असे सारखेच अवयव असतात. पण माणसाला जातीचा अलंकार चढला कि, तो माणुसकी व माणसाला विसरतो आणि स्वतःला वेगळं समजू लागतो हि वस्तुस्थिती आहे.

.. मनोज गुजर

विचार ४८.

निर्मात्याने पृथ्वीतलावर प्रत्येक गोष्ट हि, वेगळी बनविली आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. इतकेच नाही तर पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब सुद्धा सारखा नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपापले वेगळेपण लाभले आहे आणि प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी सुंदर व एकमेव आहे. मग मानवाने स्वतःची तुलना एक-दुसऱ्याशी करून, का बरे स्वतःला कमी समजावे..?.

.. मनोज गुजर

विचार ४७.


दारूड्यांना कोण सांगेल व त्यांना कधी उमगेल कि, आपण दारू पितो व दारू आपल्याला खाते.
 
.. मनोज गुजर

विचार ४६.

पैसा कमवून कुजवण्यापेक्षा लोकांच्या हृदयात जागा रुजवा. पैसा कितीही कमवला तरी शेवटी त्याला इथेच सोडून जाणार आहोत पण लोकांच्या हृदयात रुजवलेली जागा चिरंतर राहील.

.. मनोज गुजर

पैसा कमावण्यासाठीच व प्रोपर्टी जमावण्यासाठीच जगू नका.


मनुष्य प्रोपर्टी कमावण्यासाठी अहोरात्र झटत असतो. आयुष्य म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे आयुष्य हे समीकरण स्वतःशी जुळवून आयुष्याचे गणित सोडवत असतो. पण हि क्षणिक प्रोपर्टी कमवण्यासाठी मनुष्य शरीररूपी करोडो रुपायाची प्रोपर्टी गमवतो. 

समजत नाही मनुष्य इतका का पैशाच्या नशेत झिंगत असतो. ज्या प्रोपर्टी वर Tax लागतो, तिलाच कमविण्यासाठी मनुष्य आयुष्यभर धडपडतो व शरीर गमवतो. पण याउलट शरीररूपी प्रोपर्टीचं आहे, हवी तेवढी कमवा कुठल्याही प्रकारचा tax भरावा लागत नाही (No Tax).

पैसा अवश्य कमवा, प्रोपर्टी अवश्य जमवा पण पैसा कमावण्यासाठीच व प्रोपर्टी जमावण्यासाठीच जगू नका.

.. मनोज गुजर

विचार ४५.

आपण सुंदर विचार लिहितो, सांगतो, ऐकतो, ऐकवतो पण तो सुंदर विचार स्वतः आचरणात आणणे खूप कठीण असतं.

.. मनोज गुजर 

भविष्य

आपलं भविष्य दुसरा तिसरा कोणीही घडवत नसतो तर आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवत असतो.

जसे कर्म कराल तसं फळ मिळेल. मग कर्म चुकीचे, नकारात्मक (Negative) असेल तर कोणत्या न कोणत्या वेळी फळ सुद्धा (Negative) नकारात्मकच मिळेल, त्याचं रिटर्न माणसाला अवश्य मिळतं हे निश्चित. कर्म चांगले (Positive) असेल तर फळ सुद्धा चांगलेच (Positive) मिळेल यात दुमत नाही.

आपलं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर त्यासाठी आपण कोणत्या कर्माची निवड करावी हे आपणच ठरवायचं असतं. त्यासाठी कुठल्या ज्योतीष्याकडे जाऊन हात दाखवाची गरज नाही, कुठला खडा बोटात घालायची गरज नाही, वास्तुशास्त्राप्रमाणे जागा बदलण्याची गरज नाही. असल्या बाह्य  बदलाने आपले भविष्य घडणार नाही तर आपल्या आंतरिक बदलाने आपले भविष्य घडणार आहे.

.. मनोज गुजर