Tuesday, 6 August 2013

विचार ७.


ज्ञान मिळवायचं आणि वाढवायचं
एक सोपं समीकरण म्हणजे,

घेतलं तर मिळेल.
आणि 
दिलं तर वाढेल.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

नशीबाची खरी व्याख्या.


एखादा माणूस, दिन रात कष्ट करतो, मेहनत करतो, अनेक संकटाना तोंड देतो, परीस्थितीशी लढा देतो, झोप विसरतो, सुखं त्यागतो, अनेक दुखं झेलतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा लोक म्हणतात, खरचं नशिबवानआहे तो. पण त्याच्या यशाच्या मागे हि सारी मेहनत त्याने घेतलेली असते हे मात्र आम्ही विसरतो आणि फक्त म्हणत असतो नशीबवान आहे तो.   

हि आहे नशीबाची खरी व्याख्या.

पण आम्ही मेहनतीला बगल देऊन यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यात अपयश पदरी आले कि, आमच्यात नशीब ह्या शब्दाचा जन्म होतो आणि आम्ही म्हणतो कि माझ्या नशिबातच नव्हते ते. अपयश आल्यावर आपणच आपल्या मनाची केलेली समजूत म्हणजे नशीब.

हि आहे आम्ही केलेली नशीबाची व्याख्या.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३ 

विचार ६.

प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात.
१) तुमची
२) माझी
३) सत्याची 
 
प्रत्येक जन आप आपली बाजू मांडत असतो.
पण सत्याची बाजू हि वेगळीच असते.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

आस्तिक आणि नास्तिक म्हणजे काय...??

देवाला न मानने म्हणजे नास्तिक का..?.
देवळात न जाने म्हणजे नास्तिक का..?.
देव धर्माला विरोध करणे म्हणजे नास्तिक का..?.
देव धर्म विरोधी लिहिणे म्हणजे नास्तिक का..?.
देवाला शरण न जाने म्हणजे नास्तिक का..?.

आज आमच्या सुशिक्षित वर्गाने वरील सर्व प्रश्नात जो बसतो त्याला नास्तिक ठरविले आहे.

पण माझ्या मते आस्तिकता, देव किंवा दैवी शक्ती म्हणजेनिसर्गात जो बदल होतो ती एक शक्ती आहे त्याला दैवी शक्ती म्हणतात.
बाळ जन्मल्यावर आईच्या स्तनात दुध (अमृत) येते हि एक शक्ती आहे त्याला दैवी शक्ती म्हणतात.
रात्री झोपल्यावर श्वास चालू राहणे आणि सकाळी आपसूक जाग येणे हि एक शक्ती आहे त्याला दैवी शक्ती म्हणतात.
मानवाच्या डोक्यात सुपीक विचार नाद करणे आणि त्याच्या हातून सुंदर लेखणीने जन्म घेणे हि एक शक्ती आहे त्याला दैवी शक्ती म्हणतात.
फक्त देवळात जाने, देवाला शरण येणे म्हणजे आस्तिकता नव्हे तर उत्तम कर्म, निस्वार्थी कर्म, परमार्थ आणि सुपीक विचार या सर्वांचा संगम ज्याच्या ठायी आहे त्यालाच खरा आस्तिक म्हणावा. 
   
.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

विचार ५.

जे गुण तुझ्यात आहे ते गुण  माझ्यात नाही.
आणि
जे गुण माझ्यात आहे ते गुण तुझ्यात नाही.

हे समीकरण लक्षात असू द्या.

इथे सर्व माणसे एकसारख्या बुद्धीमत्तेचे आहेत फक्त प्रत्येकाने प्रत्येकाच्या गुणांचा आदर करायला हवा. आपण चांगला, वाईट किंवा लहान, मोठा हा  जो व्यक्ती व्यक्तींमध्ये  फरक  करतो  त्याला सर्वस्वी आपला दृष्टीकोनच जबाबदार आहे.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

विचार ४.


आदर दिला तर आदर मिळेल.
 
जीवनात उंच भरारी घेण्यासाठी हा निसर्गाचा 
सर्वोत्तम नियम लक्षात असू द्या .

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

विचार ३.


शब्द हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.

ते शस्त्र,
काहींना अतिशय उंचावर नेते.
आणि
काहींना नेहमी खाली ठेवते.

म्हणून हे शस्त्र योग्यरीत्या वापरा मग आपण सुद्धा एक दिवस 
जगाच्या पाठीवर अतिशय उंचावर विराजमान होऊ.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३