Monday, 2 September 2013

धावते युग, आम्ही आणि आमचे आई वडील.


आज आम्ही धावत्या युगात धावायला कमी पडतो.
आज आम्ही आमची बाजू सक्षम पणे आणि व्यवहारिक 
दृष्ट्या व्यवस्थित मांडू शकत नाही.
आज आम्ही समाजात व्यवहार शून्य जगतो.
आज आम्ही इतर मुलांच्या तुलनेत कमी ठरतो.  
जर कधी आमच्या आई वडीलांनी आम्हाला बाजार करायला 
सांगीतला तर आम्ही बाजार न करता बाजार भरवून ठेवतो.

पण ह्या सर्व गोष्टींना दुसरा तिसरा कोणी कारणीभूत, जबाबदार नसून आमचे आई वडील ह्या सर्व गोष्टींना कारणीभूत आहेत.

आमचा १८-२२ वयोगटाचा वर्ग आज सुशिक्षित, उच्च शिक्षित व शिक्षण घेणारा आहे. पण आज हाच वर्ग दुध डेअरी मध्ये गेल्यावर ताक किलो मध्ये मागतो, दुध किलो मध्ये मागतो, दही लिटर मध्ये मागतो काही तर महाभाग असे आहेत कि त्यांना दही ६० रु. किलो आहे तर १ पाव दही कितीचं होईल हे सांगता येत नाही, काहींना साखरेचा भाव माहित नाही तर ह्या सर्व गोष्टींना कोण कारणीभूत आहे...??. जर आमचे आई वडील पोराला सर्व गोष्टी हातात आणि जागच्या जागी देतात तर कसा कळेल त्यांना वस्तूचा भाव आणि लिटर व किलो मधला फरक. 
 
आमचा तरुण वर्ग नवनवीन कॉलेजला जातो तर तिथलं वातावरण पाहून तो थोडा घाबरतो, अडखळतो, लवकर तिथल्या वातावरणाशी तो जुळत नाही कारण त्याने कॉलेज हे फक्त काल्पनिक रंगवलेलं आणि पाहिलेलं असतं, प्रत्येक्षात कधी पाहिलेलं नसतं म्हणून कॉलेज व विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आई वडिलांना मुलांच्या सोबत जाऊन मुलांची वकिली करावी लागते. 

आज आमच्या तरुण वर्गाला बँकेचा व्यवहार कसा चालतो हे कळत नाही, बँकेत गेल्यावर आमचा तरुण वर्ग, हरवल्यागत सर्वांच्या तोंडाकडे पाहत असतो इतकी दयनीय अवस्था आहे आमच्या तरुणांची.   

म्हणून आमच्या वडीलधारी वर्गाला एक विनंती करतो कि, आपल्या मुलांना ८ ते १६ ह्या वयोगटात असतांना त्यांना कॉलेज (महाविद्यालय), विद्यापीठ (University) दाखवा, बँक दाखवा, बँकेचा व्यवहार शिकवा, बाजारात घेऊन जा, बाजार करायला शिकवा, अडचणींना तोंड देण्याची सवय होऊ द्या, स्वतःची कामे स्वताः करायला सांगा आणि ज्या दिवशी तुमचा मुलगा स्वतःची कामे स्वतः करेल, व्यवहारिक म्हणून समाजात वावरेल त्या दिवशी त्याचे शिक्षण हे खरे उपयोगी ठरेल आणि याचा आनंद तुम्हाला आणि तुमच्या मुलाला सुद्धा होईल. मग तो कुठल्याही क्षेत्रात कमी पडणार नाही हि सुद्धा खात्री आहे.      
   

जय जिजाऊ
जय शिवराय 


शिव-अर्पण मनोज  दि २/०९/२०१३           

विचार ३२.

आपला दृष्टीकोन जसा असेल तसं आपल्याला जग दिसेल.
म्हणून सांगतो आपला दृष्टीकोन बदला जग आपोआप बदलेलं 
दिसेल.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३

विचार ३१.

तरून पिढीची मस्तके सुधारली तर अर्थव्यवस्था सुधारायला वेळ नाही लागणार आणि तरून पिढीची मस्तके तेव्हाच सुधारतील जेव्हा त्यात महापुरुषांचे विचार, सुपीक विचार आणि वस्तुस्थिती यांची जाणीव व भरणा केला जाईल. कारण मस्तके सुधारली कि, सकारात्मक विचार दृष्टीकोन यांचा जन्म होतो आणि सकारात्मक विचार दृष्टीकोन ह्यामुळे मनुष्य बुद्धीचा सुलभ सुपीक वापर करतो आणि बुद्धीच्या सुलभ सुपीक वापरावर मनुष्य आर्थिक सत्ता गाजवतो हि वस्तुस्थिती आहे.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३

विचार ३०.

माणसाने कार्य असे करावे कि आपण काही न बोलता आपले कर्तुत्व सर्व काही बोलायला हवे.
पण आज परिस्थिती वेगळी आहे, आज बाजारगप्पा करणारे फडफड तोंड वाजवताय आणि कर्तुत्वशून्य जगताय.
 
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३