१५ ऑगस्ट २०१३ भारताच्या ६७ व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल वयक्तिक मत व्यक्त करत आहे.
आज आपल्या देशाचा स्वातंत्र दिन.
कधी कधी प्रश्न पडतो कि,
कधी कधी प्रश्न पडतो कि,
खरचं स्वातंत्र झाला आहे का
आमचा देश...??
खरचं स्वातंत्र
मिळविलेला भारत आहे का हा...??
आमच्या देशात शेतकरी वर्ग
दिन रात काबाड कष्ट करून, जीवाचं रान करून, जीवाला निसर्गावर टांगून ठेवत शेती करत असतो आणि जर निसर्गाने रौद्र रूप घेतलं तर सोन्यासारखं पिक जागीच खाक होतं तेव्हा शेतकरी सावत्र
झाल्यागत, डोळ्यातले अश्रू डोळ्यात लपवत, जिवंत असून मेलेला असतो आणि आमचा राजकारणी वर्ग उघड्या
डोळ्यांनी शेतकऱ्याचा अंत पाहत असतो व त्याची समजूत घालत असतो.
तर याला म्हणावे का स्वातंत्र
मिळविलेला व झालेला भारत...??
आज शेतकऱ्यांसाठी लाखो
योजना कागदोपत्री मंजूर असून प्रत्येक्षात ती योजना शेतकऱ्यापरियंत पोहचत नाही शिवाय मंजूर झालेला निधी
शेतकऱ्याला मिळत नाही.
तर याला म्हणावे का
स्वातंत्र मिळविलेला व झालेला भारत...????
शेतकरी बी बियाणे कर्ज
काढून विकत घेतो आणि पावसाने पाठ फिरवली कि, पुन्हा बिजवायी विकत घेऊन दुबार पेरणी
करतो. पण सिंचनासाठी मंजूर झालेल्या योजना व निधी आमचा राजकारणी वर्ग शेतकऱ्याच्या उपयोगी येऊ देत नाही तर
तो स्वतःच्या तिजोरीत भरतो.
तर याला म्हणावे का
स्वातंत्र मिळविलेला व झालेला भारत...????
वेगवेगळ्या योजना, निधी शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून शेतकरी वर्ग कर्जबाजारी
होऊन आत्महत्या करतो आणि ह्या राजकारणी वर्गामुळे आमच्या माय माऊलीचा
कुंकू पुसला जातो व इवलीशी पोरं सावत्र होऊन समाजात वावरतात.
तर याला म्हणावे का
स्वातंत्र मिळविलेला व झालेला भारत...????
शेतकऱ्याचा माल हा वाजवी भावात घेऊन दुपटी भावाने
विकला जातो. व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांचे होत असलेले शोषण राजकारणी वर्ग उघड्या
डोळ्याने पाहतो आणि ह्या सर्व गोष्टींवर पांघरून घालण्याकरिता शेतकरी वर्गाला
पुन्हा नव नवीन योजनांचे आमिष दाखवतो.
तर याला म्हणावे का
स्वातंत्र मिळविलेला व झालेला भारत...??
आज लाखो लोक पोटाची खळगी भरण्याकरीता वणवण भटकत
आहे, काही उपाशी मरत आहे, आईला
पुरेसा आहार न मिळाल्याने जन्मलेल्या बाळाला आईचं दुध मिळत नाही म्हणून जन्मलेलं बाळ कुपोषिताचे शिकार होत आहे आणि एकीकडे सरकारी अन्न धान्याच्या
गोदामात अन्नाची नासाडी होते पण ह्या गोर गरीब जनतेपरीयंत अन्नाचे दोन घास पोहचत
नाही.
तर याला म्हणावे का
स्वातंत्र मिळविलेला व झालेला भारत...????
गोर गरीब लोकं निवाऱ्यासाठी दोन काठ्या आडोशाला
लाऊन उभारलेल्या झोपडीत थंडी, वारा, उन,
पाऊस याची पर्वा न करता जीव मुठीत घेऊन माय बाप आपल्या इवलाश्या पोरांना पोटात
घालून झोपताय आणि एकीकडे हुडको, घरकुल सारख्या योजना असून गोर गरिबांच्या सेवेत नाही पण कागदोपत्री सेवेत
असल्याचे दाखवून राजकारणी वर्ग त्या योजनांचा पैसा स्वतःच्या खिच्यात भरतोय.
तर याला म्हणावे का
स्वातंत्र मिळविलेला व झालेला भारत...????
पुन्हा आज आमचा राजकारणी वर्ग, अधिकारी वर्ग पांढऱ्या शुभ्र पोशाखात, सरकारी
वाहनातून, पोलीस वर्गाचा ताफा घेऊन वेळेच्या आधी आपआपल्या
कार्यालयात हजर राहून देशाबद्दल असलेले प्रेम आपल्या भाषण बाजीतून सांडतील आणि मनात
पुन्हा स्वार्थी भूमिका ठेऊन तिरंग्याला एका दिवसापुरता सलामी देतील.
तसेच भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान देशाचे पहिले नागरिक म्हणवून घेत सक्षम आणि विकसित भारताचे
स्वप्न रंगवतील आणि वेग वेगळ्या योजना सुरु करण्याचे आमिष दाखऊन पुन्हा पुर्वरीत
कारभार चालू ठेवत येरे माझ्या मागल्या याची पुनरावृत्ती करतील.
मी, देशाचा नागरिक असल्या कारणाने इच्छा नसतांना पण माझ्या देशाचा गौरव इतर देशांच्या तुलनेत कमी न पडावा याची काळजी घेत अपना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.
वंदे मातरम.....
जय हिंद
..ණ मनोज गुजर दि– १५/०८/२०१३