Sunday, 25 August 2013

विचार २४.




"मी पणा" आणि "अपेक्षा" ह्या दोन गोष्टी माणसात "क्रोध" (राग) उत्पन्न करणाऱ्या  महत्वाच्या बाजू व उगम स्थान आहेत.
.. मनोज गुजर 

Friday, 23 August 2013

विचार २३.

कोणतेही कार्य करतांना अपेक्षा न ठेवता केले तर त्याला अनपेक्षित यश मिळते.

.. मनोज गुजर दि– २४/०८/२०१३  

Thursday, 22 August 2013

विचार २२.

मनुष्य हा विचारी प्राणी आहे पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय तो विचार करत नाही.
 
.. मनोज गुजर दि– २३/०८/२०१३  

Sunday, 18 August 2013

आयुष्यात आनंदी राहण्याचे समीकरण.


आनंदी राहण्याचे एकमेव समीकरण म्हणजे,

अपेक्षा न ठेवता निस्वार्थी कार्य करावे


आनंदी राहण्याचे समीकरण हे,


        पूर्ण झालेल्या इच्छा
आनंदी = --------------------------
        अपूर्ण राहिलेल्या इच्छा


वरील समीकरणावरून समजतं कि, आपल्या अपूर्ण असलेल्या इच्छांच्या संख्येपेक्षा पूर्ण झालेल्या इच्छांची संख्या नक्कीच कमी असणार आहे. मग ह्या समीकरणातून येणारे उत्तर सुद्धा निगेटिव म्हणजे point (पोइंट) मध्ये असणार आहे. 

पण आपण कोणतीही इच्छाअपेक्षा न ठेवता कार्य केले तर अपूर्ण राहिलेल्या इच्छांची संख्या हि शून्य होईल कारण आपण कुठलीही अपेक्षाइच्छा मनी बाळगत नाहीये आणि आपली जरी अपेक्षा किंवा इच्छा नसली तरी समोरच्याची इच्छा पूर्ण झाली तर पूर्ण झालेल्या इच्छांची संख्या हि अपूर्ण राहिलेल्या इच्छांच्या संख्येपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. मग वरील समीकरणात आपण पूर्ण झालेल्या इच्छांची संख्या टाकली आणि अपूर्ण असलेल्या इच्छांची संख्या हि शून्य टाकली तर कोणत्याही संख्येला शून्याने भागले, तर उत्तर हे अनंत (Infinity) येते म्हणजे आपण जीवनात खूप आनंदी आहोत आणि आनंदी आहे हे स्पष्ट होते. 


शेवटी एकच सांगतो कि, आपण आपल्या जीवनात वरील समीकरणाचा वापर केला तर आपण खूप आनंदी राहू शकतो व दुसऱ्याला आनंद देऊ शकतो.  

.. मनोज गुजर दि– १८/०८/२०१३  

Saturday, 17 August 2013

विचार २१.


कटू सत्य.

आपण आपल्याला काय आवडतं हे न करता 
लोकांना काय आवडतं तेच नेहमी करत असतो.

.. मनोज गुजर दि– १८/०८/२०१३