Sunday, 8 September 2013

कटू सत्य.

एक कोणतीतरी गुपित शक्ती माणसाच्या शरीरात आहे कि ज्या शक्तीमुळे माणसाचे तोंड बोलते, माणूस डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, नाकाने श्वास घेऊ शकतो, माणसाचे हात हलतात, पाय चालतात, मेंदू काम करतो आणि लगेच प्रतिसाद सुद्धा देतो, माणसाचे हृदय धडधडते, त्या शक्तीच्या असण्यामुळे माणूस नाचतो, गीत गातो प्रत्येक गोष्ट करू शकतो.
   
हे सर्व त्या शक्तीच्या असण्यामुळे होत असतं. 

पण ती शक्ती माणसाच्या शरीरातून निघून गेली तर माणूस बोलू शकत नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही, त्याचे हात हलवू शकत नाही, त्याचे पाय चालू शकत नाही, मेंदू कार्य करत नाही आणि हृदय सुद्धा धडधडणे बंद होते, आयुष्यातल्या सर्व गोष्टी एकदम थांबतात आणि माणूस कायमचा झोपतो. 

हे सर्व त्या शक्तीच्या नसल्यामुळे होत असतं.  

मग ती शक्ती नेमकी काय आहे...???

तर त्या शक्तीला काही लोकं चेतना शक्ती म्हणतात, आत्मा म्हणतात, परमात्मा म्हणतात, काही देव म्हणतात. प्रत्येकाचं समजणं आणि मानणं वेगवेगळं आहे त्यात दुमत नाही.  

जय जिजाऊ
जय शिवराय 

शिव-अर्पण मनोज  दि ०८/०९/२०१३     

Friday, 6 September 2013

कारण आणि परिणाम (Cause & Effect)

कोणत्याही गोष्टीला कारण (Cause) आहे म्हणून त्या गोष्टीचा परीणाम (Effect) आहे आणि कारण जर वगळले तर काहीच उरणार नाही हे कटू सत्य आहे. 

उदाहरणार्थ : -

सूर्यप्रकाश आहे कारण सूर्य आहे म्हणून सूर्यप्रकाश आहे.
पुस्तक आहे कारण लेखक आहे म्हणून पुस्तक आहे.
सुवर्ण जळीत दागिने आहे कारण सोनं आहे म्हणून सुवर्ण जळीत दागिने आहे.

म्हणून सांगतो आपल्या आयुष्यात कुठलीही आनंदी किंवा दुखी घटना घडली तर त्याचे कारण पहिले शोधा त्यावर विचार करा. मग भविष्यात आपण नेहमी आनंदी राहू शकतो. 
 
जय जिजाऊ
जय शिवराय 

शिव-अर्पण मनोज  दि ०६/०९/२०१३  

Thursday, 5 September 2013

केवळ बोलण्यामुळेच.


माणसाच्या जीवनात आजवर कोणतीही गोष्ट झाली असेल, होत असेल किंवा भविष्यात होईल तर ती फक्त बोलण्यामुळेच.

रामायण झाले ते बोलण्यामुळे.
महाभारत घडले ते बोलण्यामुळे.

वाद होतात ते बोलण्यामुळे.
वाद सुटतात ते बोलण्यामुळे.

मैत्री होते ते बोलण्यामुळे.
मैत्री तुटते ते बोलण्यामुळे.

आपले परके होतात ते बोलण्यामुळे.
परके आपले होतात ते बोलण्यामुळे.

प्रेम होते ते बोलण्यामुळे.
प्रेम तुटते ते बोलण्यामुळे. 

मन जुळतं ते बोलण्यामुळे.
मन दुरावते ते बोलण्यामुळे.

नाते जुळतात ते बोलण्यामुळे.
नाते तुटतात ते बोलण्यामुळे.

ज्ञानी ठरतो ते बोलण्यामुळे.
अज्ञानी ठरतो ते बोलण्यामुळे.

यशस्वी होतो ते बोलण्यामुळे.
अयशस्वी होतो ते ते बोलण्यामुळे.

जीवनात उच्च पदी बसतो ते बोलण्यामुळे.
जीवनात नेहमी खाली बसतो ते बोलण्यामुळे.


सांगण्याचा उद्देश एकच आहे कि, जीवनात ईतरांशी संभाषण, संवाद साधतांना नेहमी नम्रतेने साधा, मुखात नेहमी गोडवा असू द्या. ज्या विषयाची आपल्याला माहिती नसेल तर त्या विषयाची माहिती समोरच्याकडून माहित करून घ्या आणि जर तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती असेल तर त्या विषयाची माहिती समोरच्याला माहित करून द्या.

प्रत्येकाचे विचार सारखेच असतील असे नाही पण आपल्या बोलण्यात जर नम्रता असेल तर समोरच्याला आपले विचार आपण पटवून देऊ शकतो.

विद्या विनयेन शोभते हे समीकरण ध्यानात असू द्या.
 
जय जिजाऊ
जय शिवराय 
 
शिव-अर्पण मनोज  दि ०५/०९/२०१३

एक सुंदर काव्य "पेक्षा"....


परिस्थितीवर रडण्यापेक्षा 
परिस्थितीशी लढण्यात मजा आहे.
नशिबावर नतमस्तक होण्यापेक्षा 
मेहनत करण्यात मजा आहे.

स्वार्थ मिरविण्यापेक्षा 
परमार्थ करण्यात मजा आहे.
फक्त फुल झेलण्यापेक्षा 
काट्यावर चालण्यात मजा आहे.

व्यसनात झिंगण्यापेक्षा 
बलाढ्य बनण्यात मजा आहे.
अस्तित्व शून्य जगण्यापेक्षा 
नाव करून मारण्यात मजा आहे.

फक्त घेण्यापेक्षा 
मनापासून देण्यात मजा आहे.
सुखात राहण्यापेक्षा 

दुखं झेलण्यात मजा आहे.

अश्रू ढाळन्यापेक्षा 
कुणाचे अश्रू पुसण्यात मजा आहे.
कुणाची चाकरी करण्यापेक्षा 
कष्टाची भाकरी खाण्यात मजा आहे.


जय जिजाऊ
जय शिवराय 
  
शिव-अर्पण मनोज  दि ०५/०९/२०१३