Monday, 29 April 2013

मुक्या प्राण्यांना जगू द्या.


हा लेख फक्त वाचू नका तर त्यातून बदल घडावा हा हट्ट नक्कीच बाळगला आहे. (मी माझ्यात हा बदल केला आहे तुम्ही सुद्धा करा.)

बंधुंनो…..माझ्या माताभगिनिंनो मुक्या प्राण्यांवर कधीही अत्याचार करू नका शिवाय मुक्या प्राण्यांच्या जीवाला जपा. मुक्या प्राण्यांच्या अबोल वाणीला काळजातून जपा व समजून घ्या. आम्ही मुक्या प्राण्याच्या शिजवलेल्या मासात आमचा जीव ओतत आहोत, मटन, चिकन चा बाजार घालत आहोत. शिवाय कुठलाही विचार न करता मुक्या प्राण्यांचा बळी घेत आहोत. आपल्याला साधा ताप जरी आला तरी आपण थंडीने कापत असतो पण इथे तर आम्ही उघड्या डोळ्यांनी मुक्या प्राण्यांचा जीव जातांना पाहत असतो. आमचं काळीज दगडाहून बेहत्तर झालं आहे. मानवता हाच खरा धर्म जाणणारे आम्ही, त्याच धर्माला विसरलो आहोत. आमचा जीव मुक्या प्राण्यांच्या शिजवलेल्या रसरशीत रस्यात आहे. अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणणारे आम्ही, ताटाला नमस्कार करूनच घास तोंडात घालायचो. पण चिकन, मटन खाणारे आम्ही अन्नाच्या घासाला तोंडात घालण्यापूर्वी स्वतःच्या ताटाला नमस्कार तरी कसे करू शकतो..?. मटणाच्या गाड्यांवर लाईन लाऊन कलेजा दे, वझडी दे असं मागणारे आम्ही कसे काय स्वतःच्या ताटाला नमस्कार करू शकतो..?. स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून ५० किलोमीटर तोंडात मटणाची लाळ घेवून जाणारे, मटणासाठी हपापलेले आम्ही कसे काय स्वतःच्या ताटाला नमस्कार करू शकतो..?.
अरे मानवा तुला कोणी सांगायचं तुझ्या पोटात जाणारा मटन, चिकन नावाच्या पदार्थाला पचायला ७२ तास लागतात. मटन, चिकन खात असतांना ४-५ व्या घासाला आतला परमेश्वर सांगत असतो नको खाऊ तरी आपण खात असतो. आतला परमेश्वरच्या मनाविरुद्द वागतो म्हणून तो पहिली नोटीस म्हणून नाकावर दवबिंदू आणतो तरी आपण नाक पुसत खातच असतो. पुन्हा तो नाकात शेंबूड आणतो तरी आपण नाक शिकरत खात असतो. आपण इतके एकाग्र झालेलो असतो कि ती मटणाची नळी इथे आपट तिथे आपट आणि त्यातून छोटासा गुल तोंडात पडला कि विश्व जिंकण्याचा आनंद होतो.
आमच्या माताभगिनी तर खूप आवडीने मुक्या प्राण्यांच्या शिजवलेल्या मासाला स्वीकारत असतात. अग तुला निर्मात्याने आईच काळीज दिलंय आणि तूच मुक्या प्राण्याच्या मासाला आवडीने स्वीकारतेस. तुला स्त्री जन्म मिळाला आहे. तुला आईपण दिल आहे. तुझ्या पोटी सुद्धा जगातलं सुंदर बाळ जन्म घेणार आहे. तुला सुद्धा आई च्या वेदना कळणार आहे. तुला सुद्धा तुझ्या मुलाच दुखं पाहिलं जाणार नाहीये. तुला अभिमानाने माता म्हणतात. तुला माऊली म्हणतात. जी माफ करते ती माऊली आणि तूच मुक्या जीवाला आवडीने खातेस. अग मुक्या प्राण्यांवर दया कर, प्रेम कर, त्यांच्या भावनांना समजून घे, त्यांच्या अबोल वाणीला काळजातून जप, मग पहा ह्या स्वार्थी जगात आईपण पुन्हा जन्माला येईल.
बंधुंनो...माताभगिनिंनो जरा विचार करा मुक्या प्राण्याच्या जीवाला शिजवत असतांना त्याला किती वेदना होत असतील. त्याच्या आत्म्यातून किती दुख सांडत असेल शिवाय त्यांच्या आत्म्यातून आपल्याला किती शाप मिळत असतील.
बंधुंनो...माता भगिनींनो, आजपासून आपण मुक्या प्राणी मात्रावर प्रेम करून, त्यांच्या हत्तेपासून संरक्षण करून, त्यांना सुद्धा त्यांच स्वतंत्र जीवन जगू देऊ. हे सुंदर कार्य करून माणूस म्हणून जन्माला आल्याच आणि जगात माणुसकी असल्याच समाजाला पटवून देऊ.
(हा संदेश सर्व जाती धर्मासाठी आहे. योग्य वाटत असेल तर नक्कीच विचार करा आणि माणूस म्हणून जन्मला आलो आहे हे सिद्ध करा.)
 
जे पेराल तेच उगवेल ह्या वाक्यावर विचार अवश्य करा.

जरा हे चित्र पहा आणि स्वतःच्या मनाला प्रश्न करा कि, आपण आपल्या जिभेचे चोसले पुरविण्याकरीता मुक्या प्राण्यांचा जीव घेत आहोत ते योग्य आहे कि अयोग्य..?




 .. मनोज गुजर     

Saturday, 27 April 2013

१८ पगड मावळ्यांच्या स्मरणात.


व्वा काय व्हते राजांचे संवगडी...रांगडे, हत्तीच्या ताकदीचे, जिगरीचे जिगरबाज....!!

आठवीला त्यो बाजी पासलकर.
राजांना म्हणतो,
राजं...राजं...म्या...म्या मरण झेलीन कि, 
पहिल्या लढाईत. 
व्ह्य राजं म्या..म्या हसत...हसत मरीन.

आठवीला त्यो दर्या सारंग.
राजांना म्हणतो,
राजं...राजं...म्या...म्या किल्ला बांधून काढीन 
तोफांच्या मारात 
अन राजं...जरब बसवीन समुंदरावर. 
तुम्ही कायबी काळजी करू नका राजं

आठवीला त्यो नूरखान बेग.
राजांना म्हणतो,
राजं म्या फकस्त तुमच्यासाठी हाय राजं.
म्या जातीनं नाही पण कर्मानं मराठा हाय राजं.

आठवीला त्यो कान्होजी जेधे.
राजांना म्हणतो,
राजं...राजं...म्या...म्या घेईन तुम्हास्नी बाजू अन 
त्या देशमुखास्नी तुया तुया तुडवीन म्या.  

आठवीला त्यो जिवाजी महाल.
राजांना म्हणतो,
राजं...राजं...म्या...म्या गनिमाला ठार करीन राजं.
तुम्हास्नी कायबी न्हाय करू द्यायचा.     

आठवीला त्यो बाजी प्रभू.
राजांना म्हणतो,
राजं म्या...माघारी न्हाय फिरणार राजं.
तोफाचा आवाज कानी पडल्यावरच 
देह सोडीन, 
पण माघारी नाय फिरायचा.

आठवीला त्यो बहिर्जी नाईक.
राजांना म्हणतो,
राजं त्यो काय येतुया म्या हाय कि,
जागीच उडवित्यो कि त्याला.

आठवीला त्यो मुरारबाजी.  
राजांना म्हणतो,
राजं...कोनभी येवू द्या कि राजं.
तलवारी नाचवीन म्या.
राज ह्या मातीशी अन तुम्हास्नी 
कव्हाभी फितूर न्हाय व्हायचा .

आठवीला त्यो मदारी मेहतर.
राजांना म्हणतो,
राजं बिनघोर रहा.
कायभी भय नाय...म्या..म्या बाहेर 
काढीन तुम्हास्नी सुखरूप.    

आठवीला त्यो तान्हाजी.
राजांना म्हणतो,
राजं..काय काळजी करताया राजं.
म्या जाईन कि कोंढाणा जिंकाया 
आधी लगीन कोंढाण्याच मंग रायबाचं.  

आठवीला त्यो शेलारमामा 
(८० वर्षाचं रांगड शरीर) 
राजांना म्हणतो,
राजं...म्या वयानं थकला हाय  
ताकदीन नव्ह.

येऊ द्या कोण येतुया तर,  
रेटतू कि त्याला.

आठवीला त्यो सूर्याजी.
राजांना म्हणतो ,
राजं...म्या मरेन पण सिंदगड जिंकेन. 

आठवीला त्यो कडतोजी.   
राजांना म्हणतो,
राजं...म्या खूप प्रेम करतुया 
राजं तुमच्यावर.
म्या कवाभी मराया अन माराया 
तयार हाय, 
फकस्त तुम्ही आवाज द्या राजं.

आठवीला त्यो सिद्धी हिलाल.
राजांना म्हणतो,
राजं तुम्ही मज "वारा" म्हणत्यात नव्ह, 
मंग म्या असा भी लढीन कि, 
शत्रू परत माघारी फिरकायचा न्हाय.  

आठवीला त्यो येसाजी कंक.
राजांना म्हणतो,
राजं...राजं...म्या एकटा तुडवीन 
त्या मुघलास्नी.
कायभी काळजी करू नका राजं.
तुम्हास्नी हा जीव म्या कव्हाच 
दिलाय राजं. 

आठवीला त्यो रायप्पा महार.
राजांना म्हणतो,
राजं म्या जातीनं नाही तर,
कर्मानं कर्मठ मराठा हाय. 
फकस्त हाक द्या कि राजं. 

आठवीला त्यो हिरोजी इंदलकर.
राजांना म्हणतो,
राजं तुमच्या पायच्या पायधुळीनं 
माझा अभिषेक व्हावा 
हीच इच्छा हाय माझी शेवटली.

आठवीला त्यो शिवा काशीद.
राजांना म्हणतो,
राजं...राजं...म्या....कसा दिसतुया राजं, 
हुबेहूब तुमच्यावानी दिसतुया का...?.
राजं मंग त्यो सिद्धीभी मला 
ओळखायचा न्हाय...?.
राजं म्या मरीन 
शिवाजी महाराज म्हणवूनी, 
हे भाग्य का कुनालाभी लाभतं व्हय.   

ह्या सर्व अठरा पगड जातीच्या जीगरीच्या जिगरबाज मावळ्यांना कोटी कोटी मुजरा.

.. मनोज गुजर