Sunday, 5 January 2014

देव ह्या संकल्पनेवीषयी पडलेलं कोडं.

देव कुठे असतो असा प्रश्न बऱ्याच जनांना पडतो.
कोणी म्हणतो, देव देवळात आहे.
कोणी म्हणतो, देव दगडात आहे.
कोणी म्हणतो, देव माणसात आहे.
 
ईथे देवाची संज्ञा प्रत्यकाने प्रत्येकाच्या अनुभवानुसार
व श्रद्धेनुसार वेगवेगळी केली आहे.

जसं कि, 
आपण आपल्या स्वतःबद्दल १० जनांना विचारले कि, मी कसा आहे..??
तर प्रत्येक जन आपापल्या विचारानुसार व अनुभवानुसार उत्तर देईल
व १० जनांनी दिलेले उत्तर हे सारखे नाही असणार.

तसेच देवाच्या बाबतीत आहे.
जो तो आपापल्या अनुभवानुसार व श्रद्धेनुसार देव देवळात, दगडात किंवा
माणसात पाहतो व देवाची संज्ञा मांडत असतो.

 
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि – ०५/०१/२०१४

Saturday, 4 January 2014

विचार ३५.

कोणताही नकारात्मक विचार असण्यापेक्षा,
कोणताही सकारात्मक विचार असणे कधीही चांगले.
 
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०५/०१/२०१४

Thursday, 19 December 2013

फक्त लढ...

अरे मानवा हरतोस काय,
लढ...
जीवात जीव असेपरीयंत
लढ...
कोण म्हणतंय तू हरलास
तू लढ...
अरे तुझ्यात अमर्याद शक्ती
आहे, तू फक्त लढ...
तुझ्या मनगटातलं बळ
एकवटून लढ...
निंदा करणारे निंदा करतील
तू पर्वा नको करूस, 
तू फक्त लढ... 
रक्ताच्या थेंबा थेंबातून
लढ...
अरे निधड्या छातीचा
आहेस तू, मागे फिरू नकोस
तर फक्त लढ...
अरे तूला सुद्धा २ हात आहे
ते तुझ्या यशाची शिखरे
बांधण्यासाठी वापर...
२ पाय आहेत त्यांना
यशाची शिखरे गाठायला
सांग...
२ डोळे आहेत त्यांना मोठे
स्वप्न पाहायला सांग...
शरीराच्या कणा कणातून
लढ... 
जीवनात आला आहेस
तर हरू नकोस, तर
जिंकण्यासाठी लढ...
 
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज  दि – १९/१२/२०१३

Saturday, 23 November 2013

जीवनात सर्वश्रेष्ठ प्रेम आहे कि विश्वास..??

जीवनात सर्वश्रेष्ठ प्रेम आहे कि विश्वास....??? 
तर उत्तर आहे...
 
" प्रेम "
 
पण आपण ज्यावर प्रेम करतो त्यावर सुद्धा विश्वास
ठेऊ शकत नाही मग जीवनात सर्वश्रेष्ठ प्रेम कसं काय
असू शकतं...???

थोडा विचार करा.
 
जय जिजाऊ
जय शिवराय
 
शिव-अर्पण मनोज  दि – २४/११/२०१३