राजे आम्ही जय शिवराय म्हणतांना अस म्हणतो कि, तो
आमचा हक्कच आहे. पण राजे ते मुळात तेवढ्या
पुरताच मर्यादित ठेवणारी आमची स्वार्थी मंडळी आहे. हे असलं स्वार्थी खंजीर बाळगणारे काय तुमचा हक्क
गाजवणार राजे आणि काय सोनेरी स्वराज्य नव्याने उभारणार.
राजे आज मी तुम्हाला काळजातलं एक गुपित सांगतो.
राजे आज मी तुम्हाला काळजातलं एक गुपित सांगतो.
निर्मात्याने आम्हाला डोळे दिलेत...
पण आज आम्ही ह्या डोळ्यांनी मुक्या प्राण्यांची कत्तल होताना पाहतोय.
आम्ही ह्या डोळ्यांनी भुकेल्या जीवाला तरफडतांना
पाहतोय.
ह्या जहरी नजरेने आई बहिणीची अब्रू लुटतोय.
ह्या डोळ्यांनी आपल्याच माणसावर आग ओकतोय.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच डोळ्यांनी तुम्ही अफजल रडवलाय,
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच डोळ्यांनी तुम्ही अफजल रडवलाय,
सारा मुघल पळवलाय.
ह्याच डोळ्यात तुम्ही आऊ साहेबांना सोनेरी स्वराज्य दाखवलं होतं.
ह्याच डोळ्यांनी तुम्ही स्वराज्यावर प्रेम ओतले होते.
म्हणून राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या डोळ्यांना तुमच्या सोनेरी रूपाचं दर्शन स्वप्नात तरी होऊ द्या.
म्हणून राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या डोळ्यांना तुमच्या सोनेरी रूपाचं दर्शन स्वप्नात तरी होऊ द्या.
निर्मात्याने आम्हाला कान दिलेत...
पण आज आम्ही ह्या कानाचा वापर आमच्याबद्दल होणारी
स्तुती ऐकण्यासाठी करतोय.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच कानाने तुम्ही
शत्रूच्या मांजर पावलांचा आवाज ऐकून स्वराज्याला सुरक्षित ठेवले होते.
ह्याच कानाने तुम्ही शत्रूकडून तुमचा झालेला अपमान पचवून रयतेला गुळाचा गोडवा दिला.
ह्याच कानाने तुम्ही, आई जिजाऊने शिकवलेले गनिमाचे धडे काळजीपूर्वक ऐकले होते.
ह्याच कानाने तुम्ही रयतेच्या काळजातले दुख ऐकले होते.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या कानांना तुमच्या पवित्र नामाचा जप ऐकण्याचा नाद लागू द्या.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या कानांना तुमच्या पवित्र नामाचा जप ऐकण्याचा नाद लागू द्या.
माझ्या कानात आई जिजाऊचे संस्कार विचार घुमू द्या, घोड्याच्या
टापांचा आणि हर हर महादेवाचा गजर चिरायू होऊ द्या.
निर्मात्याने आम्हाला नाक दिले...
पण आम्हाला आज "जय शिवराय" म्हणायला सुद्धा नाक राहिले नाहीये इतकी आमची दयनीय अवस्था झाली आहे.
आमच्या नाकात सुवास दरवळतोय मुक्या प्राण्याच्या शिजवलेल्या मटणाचा.
आमच्या नाकात सुवास दरवळतोय मदमस्त मद्याचा.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही मातीला मुठीत घेऊन मातीच्या वेदना व दुखं हे मातीच्या येणाऱ्या सुवासाने जानत असत.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो कि, माझ्या नाकाला तुमच्या चरणाने मंगलमय झालेल्या मातीच्या सुवासाची ओढ असू द्या.

निर्मात्याने आम्हाला मुख दिले....
पण आज आम्ही ह्या मुखाचा वापर फक्त याची अडवा
त्याची जिरवा ह्या दहाकलमी उद्योगासाठी करतोय.
ह्या मुखात आम्ही शिव्यांचा इतका साठा भरून
ठेवतोय की एकवेळ पृथ्वी तलावर
सर्व गोष्टी संपतील पण आमच्या मुखातील शिव्यांचा साठा मात्र चिरायू राहील.
ह्याच मुखाने आज आम्ही जहर ओकतोय ह्या पवित्र
स्वराज्यात.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच मुखाने तुम्ही रसाळ गोडवा ओतला होता रयतेच्या हृदयात.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच मुखाने तुम्ही रसाळ गोडवा ओतला होता रयतेच्या हृदयात.
ह्याच मुखाने तुम्ही स्वराज्य उभारण्याची शपत
घेतली होती.
ह्याच मुखाने तुम्ही सह्याद्रीत हर हर महादेव चा गजर केला होता.
ह्याच मुखाने तुम्ही हिरकनीला आई म्हणून हाक
मारली होती.
म्हणून राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या मुखात जय शिवराय हेच पवित्र नाम सदैव नाद करू द्या, माझ्या मुखातून जय भवानीची किलकारी सदैव बाहेर निघू द्या.
म्हणून राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या मुखात जय शिवराय हेच पवित्र नाम सदैव नाद करू द्या, माझ्या मुखातून जय भवानीची किलकारी सदैव बाहेर निघू द्या.
निर्मात्याने आम्हाला हात दिलेत...
पण ह्या हातांनी आज आम्ही काय पाप
करतोय याचा हिशेब नाही.
राजे ह्याच हातांनी आम्ही लाख जीव घेतोय.
ह्याच हातांनी गरीबाचा पैसा खिचात घालतोय.
ह्याच हातांनी दारूचा प्याला आम्ही ऐटीत धरतोय.
आई वडिलांनी कमावलेला घामाचा
पैसा आम्ही, ह्याच हातांनी सिगरेटच्या धुव्यात विलीन करतोय.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही ह्याच हाताच्या जोरावर आम्हाला महाराष्ट्रासारखा राजवाडा बहाल केला.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही ह्याच हाताच्या जोरावर आम्हाला महाराष्ट्रासारखा राजवाडा बहाल केला.
ह्याच हातांनी भवानी तलवार चालवली होती.
ह्याच हातांनी तुम्ही अफजल फाडला होता.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या हाताला तलवारीचा स्पर्श लाभू द्या, तुमच्या चरणाला स्वप्नात तरी स्पर्श होऊ द्या.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या हाताला तलवारीचा स्पर्श लाभू द्या, तुमच्या चरणाला स्वप्नात तरी स्पर्श होऊ द्या.
निर्मात्याने आम्हाला पाय दिलेत...
पण त्या पायांनी आज आम्ही कोनालाही तुडवत निघालोय.
ज्या आई बापांनी आम्हाला जग दाखविले त्याच आई बापांना आज आम्ही ह्याच पायांनी लाथ मारतोय.
ह्याच पायांनी आम्ही कुणाच्याही नरडीचा घोट
घ्यायला तयार आहोत.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच पायांनी तुम्ही मुघलांना तुडवले होते.
ह्याच पायांनी तुम्ही सह्याद्रीला शोभित केले होते.
म्हणून राजे तुम्हाला नमून
एकच मागतो की, माझ्या पायांना स्वराज्यासाठी धावण्याची ताकद मिळू द्या.
निर्मात्याने आम्हाला हृदय दिले...
पण आमच्या हृदयात फक्त प्रीयसीचे बोल आणि प्रीयसिचेच गीत पसारा मांडत असतात.
आमच्या हृदयात नट नट्याची स्वप्न असतात.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही ह्या हृदयात अनेक दुखं ठेऊन रयतेला आनंद दिला होता.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही ह्या हृदयात अनेक दुखं ठेऊन रयतेला आनंद दिला होता.
तुम्ही स्वराज्यात प्रेमाची हृदये उभे केली होती.
तुम्ही आई जिजाऊचे संस्कार हृदयातून जपले होते.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या हृदयात तुमचीच मूर्ती असू द्या.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या हृदयात तुमचीच मूर्ती असू द्या.
ह्या माझ्या हृदयात आई जिजाऊचे निखळ रूप नाद करू द्या आणि राजे, ज्या दिवशी ह्या
हृदयाला तुमचा विसर पडेल त्याच दिवशी माझ्या देहाची राख होऊ द्या.
राजे धडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर हा मी धडात जीव
असेपर्यंत तुमच्या सेवेत करणार.
..ණ मनोज
गुजर
Khup Chhan.... Jai Shivrai.....!
ReplyDeleteधन्यवाद सुगंधीजी.
ReplyDelete