जे वाचलं ते माझ्या मनाला भावलं आणि आपल्या समोर
मांडलं.
(Captain) शहीद विक्रम
बात्रा
(9 September 1974
– 7 July 1999) was an officer of the
Indian Army
१९९९ ला कारगिल युद्धात शहीद झालेला वय वर्ष २५
असलेला हा जवान, परमवीर चक्र विजेता आहे. यांच्याबद्दल वाचतांना शहीद
विक्रम बात्रा यांच्या आईने खूप सुंदर, काळजाला बोचणारं,
हृदयाला जखम करणारं आणि डोळ्यातून अश्रू सांडणारं बोल बोलले ते
म्हणजे...
"इस देश को मैने मेरा बच्चा कुर्बान कर दिया
है
कमसे कम आप इस देश से प्यार तो करो........"
हे वाक्य वाचलं आणि अश्रूंना डोह फुटला, अश्रू अनावर झाले.
तसेच लदाख पासून काही अंतरावर सिआचीन सीमारेषा
आहे. कधीतरी सिआचीन सीमारेषाबद्दल वाचा आपल्याला कळेल कि, आमचे जवान (सैनिक) किती कठीण परीस्थितीत, देशावर आयुष्य ओवाळून,
कुटुंबाचा स्वार्थ न पाहता, पोटच्या
मुलाबाळांची पर्वा न करता, दिवस रात्र डोळे ठीजे परीयंत आणि
रक्ताचं पाणी होईपरीयंत स्वतःच संवरक्षण विसरून आमच्या संवरक्षणासाठी स्वतःच्या
खांद्यावर बंदुकीचा भार उचलतात.
सिआचीन सीमारेषाला जगातली सगळ्यात उंच आणि थंड
वातावरण असलेली सीमारेषा मानली जाते. हि सीमारेषा समुद्रसपाटीपासून २०,०००
फुट उंच आहे. सिआचीन सीमारेषावर नेहमी -४५ ते -६० डिग्री सेल्सिअस तापमान असतं.
जवानांना नेहमी -४५ डिग्री सेल्सिअस वातावरणात राहावे लागते. असल्या अति थंड वातावरणात
अन्नाचा घास सुद्धा पोटात उतरत नाही. तीन तीन महिने आमचा जवान अंघोळ करत नाही इतका
गारठा असतो त्या सीमारेषेवर. ज्या वेळी आमचा जवान सिआचीन सीमारेषेवर आमच्या
संवरक्षणासाठी उभा ठाकतो आणि ज्या वेळी त्या सीमारेषेवरून खाली परततो त्या वेळी
त्याचे २० किलो वजन कमी झालेले असते. तो त्या सीमारेषेवरून जिवंत खाली परतेलच याची
सुद्धा खात्री नसते.
हे सर्व वाचल्यावर आणि ह्या सर्व घटनेचे चित्रण
पाहिल्यावर मनात विचार आला कि, आज आम्ही गुण्या गोविंदाने आमचा दिनक्रम सुरळीत
पार पाडतो. आमची हौस मौज करत दिवस आनंदाने संपवतो. आमचे सणवार आम्ही मोठ्या उत्सहाने
साजरे करतो. पण हे सर्व केवळ आमच्या जवानांच्या उपकरामुळेच साध्य होऊ शकते हे
मात्र आम्ही विसरतो.
उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना, युवा पिढीला असल्या गोष्टींची व आमच्यासाठी दिन रात झटणाऱ्या सैनिकांची जाणीव जरी
झाली तरी खूप आहे पण हि जाणीव होणे महत्वाचे आहे.
पण आज आम्ही व आमची युवापिढी राजकारण, जातिवाद, आणि धर्मवाद असल्या निरर्थक वादाच्या डोहात बुडाले आहेत.
पण आज आम्ही व आमची युवापिढी राजकारण, जातिवाद, आणि धर्मवाद असल्या निरर्थक वादाच्या डोहात बुडाले आहेत.
शेवटचे सांगतो माणसातला माणूस हरवला कि तो धर्म
आणि जात याला जास्त महत्व देतो म्हणून सांगतो आपल्यातला माणूस हरू देऊ नका तर त्याला जिवंत ठेवा आणि माणुसकी जपा व माणसाला आणि त्याच्या कार्याला महत्व द्या.
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज दि – ०६/१०/२०१३
No comments:
Post a Comment