Saturday, 17 August 2013

विचार २०.


प्रत्येकाकडून चांगलं घेत रहा आणि प्रत्येकाला चांगलं देत रहाजीवनात आपल्याला १००० वाईट लोकं भेटतील तर १० चांगले. तर त्या १० चांगल्या लोकांना आपलं करून आणि १००० वाईट लोकांना आपलं समजून १०१० चांगले विचार मिळविता आणि स्वीकारता येतात.

.. मनोज गुजर दि– १८/०८/२०१३  

Friday, 16 August 2013

विचार १९.


शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.  

.. मनोज गुजर दि– १७/०८/२०१३ 

विचार १८.


कोणतही काम किंवा कार्य असे करा कि, त्या कामाला किंवा कार्याला गर्व असला पाहिजे कि तुम्ही त्याला केले आहे.

.. मनोज गुजर दि– १६/०८/२०१३  

विचार १७.


आज आम्ही आमच्या विचार क्षमतेचा आणि बुद्धिमत्तेचा रीमोट समोरच्या च्या हाती देऊन आमच्या विचार क्षमतेला व बुद्धिमत्तेला कायमचा थांबा दिला आहेमग समोरचा जे बटन दाबेल तसे आम्ही विचार करतो, वागतो, बोलतो आणि नाचतो सुद्धा.

संदर्भ :-
जर कोणी आम्हाला सांगीतले कि, हे खरं आहे आणि हे खोटं आहे, हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. तेव्हा आम्ही थोडाही विचार न करता व बुद्धीचा वापर न करता दुसऱ्याने सांगितलेल्याप्रमाणे खरं किंवा खोटं, चांगलं किंवा वाईट ठरवत असतो. 

.. मनोज गुजर दि– १६/०८/२०१३ 

Thursday, 15 August 2013

विचार १६.


आयुष्यात आपल्या गुणवत्तेपेक्षा कमी गुणवत्ता असलेले १००० लोकं आपल्याला दिसतील तर १० लोकं आपल्या गुणवत्तेपेक्षा जास्त गुणवत्ता असलेले दिसतील. म्हणून नेहमी त्या १००० लोकांकडे पाहून आपण आपल्या अपयशाचं समाधान न करता जे १० लोकं आपल्या गुणवत्तेपेक्षा जास्त गुणवत्ता असलेले आहेत त्यांच्याकडे पाहून आपण आपल्या यशाची शिखरे गाठायला हवी. 

.. मनोज गुजर दि– १६/०८/२०१३