Friday, 9 August 2013

विचार ११.

नशिबाने मेहनत घडत नसते 

तर,

मेहनतीने नशिब घडत असतं.

.. मनोज गुजर दि– ०९/०८/२०१३  

विचार १०.


अस्सल विचारवंत, अभ्यासक आणि बुद्धिवान मनुष्य कुठलाही वाद न घालता कर्तव्य करत असतो. कारण तो मौन जरी पाळत असला तरी त्याचे कर्तव्य सर्व काही बोलत असतं आणि समोरच्याला प्रत्युत्तर देत असतं.

 .. मनोज गुजर दि– ०९/०८/२०१३  

Thursday, 8 August 2013

विचार ९.

निर्मात्याने आम्हाला विश्व दाखवलं, आवड असण्याच निवड करण्याचं संपूर्ण स्वातंत्र दिलं आहे तरी का आम्ही नशिबाचा पोशाख घालून जीवनात वावरत असतो.

.. मनोज गुजर दि– ०८/०८/२०१३  

Wednesday, 7 August 2013

विचार ८.


जीवनात यशस्वी होण्याच एकमेव समीकरण म्हणजे,

"मेहनतीला हुशारीची गरज नसते" आणि मेहनत हि 
कुणाच्याही भाळावर जन्मजात कोरलेली नसते. 
 
.. मनोज गुजर दि– ०७/०८/२०१३  

Tuesday, 6 August 2013

विचार ७.


ज्ञान मिळवायचं आणि वाढवायचं
एक सोपं समीकरण म्हणजे,

घेतलं तर मिळेल.
आणि 
दिलं तर वाढेल.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

नशीबाची खरी व्याख्या.


एखादा माणूस, दिन रात कष्ट करतो, मेहनत करतो, अनेक संकटाना तोंड देतो, परीस्थितीशी लढा देतो, झोप विसरतो, सुखं त्यागतो, अनेक दुखं झेलतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा लोक म्हणतात, खरचं नशिबवानआहे तो. पण त्याच्या यशाच्या मागे हि सारी मेहनत त्याने घेतलेली असते हे मात्र आम्ही विसरतो आणि फक्त म्हणत असतो नशीबवान आहे तो.   

हि आहे नशीबाची खरी व्याख्या.

पण आम्ही मेहनतीला बगल देऊन यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यात अपयश पदरी आले कि, आमच्यात नशीब ह्या शब्दाचा जन्म होतो आणि आम्ही म्हणतो कि माझ्या नशिबातच नव्हते ते. अपयश आल्यावर आपणच आपल्या मनाची केलेली समजूत म्हणजे नशीब.

हि आहे आम्ही केलेली नशीबाची व्याख्या.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३ 

विचार ६.

प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात.
१) तुमची
२) माझी
३) सत्याची 
 
प्रत्येक जन आप आपली बाजू मांडत असतो.
पण सत्याची बाजू हि वेगळीच असते.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३