समाज म्हणजे
काय...??
समाज म्हणजे समज
नसलेला कि, समजून न घेणारा..?, माणसाची किंमत हरवलेला व पैशाला किंमत देणारा
समुदाय म्हणजे समाज. गरिबाला कावडी मोल समजणारा व श्रीमंताला डोक्यावर घेऊन
मिरविणारा म्हणजे समाज. तोंडावर खोटी स्तुती करणारा व माघारी निंदा करणारा समुदाय
म्हणजे समाज. माणूस मनाने कितीही श्रीमंत असला तरी त्याला किंमत नाही पण त्याचा
खीचा हा पैशाने गरम हवा हि संकल्पना बाळगणारा समुदाय म्हणजे समाज असतो.
समाजात समर्थक व
विरोधक असे दोन गट असतात व आपण कोणत्या गटात जायचं हे दुसरा तिसरा कोणी न ठरवता आपणहून ठरवत असतो. आपणच आपली गटानुसार विभागणी करत असतो. जर कुणाबद्दल चार लोकं
निंदा करत असतील व ज्या व्यक्तीबद्दल ते निंदा करत असतील आणि जर तो व्यक्ती आपला विरोधक
असेल तेव्हा आपण त्या चार लोकांना शामिल होतो व आपण आपली समज करतो कि, हा आपलाच गट
आहे. अश्या प्रकारे समाजात समर्थक व विरोधक अश्या दोन गटाची निर्मिती होते आणि स्त्रिया
व माणसांची गटानुसार विभागणी होत असते हि वस्तुस्थिती आहे.
तसेच गटानुसार
लोकांची विभागणी झाल्यावर, मग समर्थक व विरोधक अश्या दोन गटांमधले लोक एक
दुसऱ्याबद्दल विनाकारण वैर ठेवतात, मतभेद बाळगतात, अबोला पाळतात. काही वेळा तर, आपल्या गटातला माणूस एखाद्या माणसाशी त्याच्या वयक्तिक वादामुळे वैर ठेवत असेल, अबोला
पाळत असेल तर आपणही त्या माणसाशी कारण नसतांना वैर बाळगतो केवळ आपल्या गटातला
माणूस त्या व्यक्तीबद्दल त्याच्या वयक्तिक वादामुळे अबोला पाळतो आहे म्हणून व ह्या
सर्व कारणांमुळे आज माणूस फक्त नावाने समाजात आहे मनाने नाही हि वस्तुस्थिती
आहे. समाजातील गरिबाला, मानसिक मनोबल खचलेल्या लोकांना पाठबळ देण्याऐवजी समाज पाठ
फिरवतो. फक्त स्वार्थ व आपल्यापणात बुडालेला हा समुदाय असतो.
शेवटी एकच
सांगतो...
आयुष्य खूप सुंदर व छोटं आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा
एक नवी संधी, नवे स्वप्न, नवी दिशा, नवा आनंद घेऊन येत असतो व येणारा क्षण, दिवस
हा भूतकाळात विलीन झाल्यावर पुन्हा कधीच परत येत नसतो. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस हा आनंदात विलीन करा. प्रत्येक क्षणात, प्रत्येक दिवसात भरभरून आनंद
लुटा. घरट्याच्या बाहेर पडून आकाशात उंच भरारी घ्या. नवीन व सुशिक्षित विचार मनी
ठेवा व नव्या विचारांवर वाटचाल करा. नव्या क्षितिजाकडे नेणारा दृष्टीकोन बाळगा. समाजातल्या
निरर्थक मतभेदात, अबोला पाळण्यात सुंदर आयुष्य व आयुष्यातला सुवर्ण वेळ व्यर्थ
घालू नका. गरीब व श्रीमंत हा फरक सोडा व मनाने श्रीमंत बना आणि मनाने श्रीमंत
असलेल्याला जवळ करा. फक्त समाज समाज करून पार समाजात विरघळून जावू नका तर
समाजाबाहेरील नाती सुद्धा भरभरून प्रेम देतात व जीवापाड जपतात हे लक्षात असू द्या.
मग ते नाते मैत्रीचे असो वा मानलेले असो ते कधीही आपल्याला समाजापेक्षा जास्त
समजून घेतात.
..ණ मनोज
गुजर
No comments:
Post a Comment