Saturday, 23 November 2013

"विचार" एक महान शक्ती आहे.

"विचार" हि जगातली सर्वात मोठी ताकद आहे. 
 
उदाहरण देतो.... 
 
आम्ही जेव्हा अयशस्वी होतो किंवा आमच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ लागतात तेव्हा आम्ही पंडिताकडे जाऊन आमचे भाग्य पाहतो आणि त्यावर तो पंडित आम्हाला आमच्या अडचणी दूर होण्यासाठी हाताच्या बोटात राशीच्या खड्याची अंगठी घालण्याचा सल्ला देतो आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही बोटात अंगठी घालतो व त्याच क्षणी आमच्या डोक्यात (Thought Create) विचार निर्माण होतो कि, यापुढे माझं सर्व काही ठीक होईल. मग तो विचार आमच्या कृतीतून आणि सकारात्मक दृष्टीकोनातून प्रत्येक कार्यात उतरतो आणि आम्ही यशस्वी होऊ लागतो. पण कालांतराने आम्हाला विसर पडतो कि, आम्ही राशीच्या खड्याची अंगठी बोटात घातली आहे व आमच्या डोक्यात निर्माण झालेला "माझं सर्व काही ठीक होईल" हा विचार पुसला जातो आणि मग पुन्हा पूर्वीसारख्या अडचणी निर्माण होऊ लागतात. तेव्हा आम्ही ज्या पंडीताकडून राशीच्या खड्याची अंगठी घेतली होती त्या पंडिताकडे जातो आणि पूर्वरत परीस्थिती निर्माण झाल्याचे सांगतो तेव्हा तो पंडित आपण घातलेली अंगठी आपल्याला काढायला सांगतो व तिला तेलात, मिठात घोळून पुन्हा आपल्या बोटात घालायला सांगतो. मग आम्ही पंडिताने सांगितल्याप्रमाणे अंगठीला तेलात, मिठात घोळतो व ती अंगठी पुन्हा बोटात घालतो आणि आमच्या डोक्यात यापुढे "माझं सर्व काही ठीक होईल" हा विचार पुन्हा निर्माण होतो (Thought Remind) आणि आमचं सर्व काही ठीक होऊ लागतं व सुरळीत चालतं.

हे सर्व काही मांडण्यात एकच निष्कर्ष समोर येतो कि, आमच्या जीवनात सुरळीत आणि सर्व काही ठीक हे आमच्या विचाराने होत असतं, राशीच्या खड्याच्या अंगठीने किंवा पंडिताच्या सल्ल्याने नाही.

"
माझं सर्व काही ठीक होईल" हा एवढासा विचार जर आम्ही आमच्या डोक्यात पिकवला तर पैसा खर्च न करता आम्ही आमचं जीवन सुरळीत व अडचणींवर मात करत जगू शकतो त्यासाठी कुण्या पंडिताकडे जाण्याची गरज नाही.
 
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज  दि /११/२०१३

विचार ३४.

"काय बोललं त्यापेक्षा कोण बोललं हे महत्वाचे आहे."
 
जर एखादा दारुडा आम्हाला अपशब्द बोलला तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या बोलण्याला मनावर घेत नाही व त्याच्या बोलण्याचा विचारही करत नाही. 
पण त्याच जागी एखादा सुशिक्षित, विचारी व्यक्ती आम्हाला काही बोलला तर त्यावर आम्ही विचार करायला हवा कि, मी कुठे चुकलो का...???. 
म्हणून काय बोललं त्यापेक्षा कोण बोललं याला जास्त महत्व आहे.  

जय जिजाऊ
जय शिवराय
 
शिव-अर्पण मनोज  दि - २४/११/२०१३

Sunday, 6 October 2013

विचार ३३.

भीती माहित नसणं म्हणजे धैर्य नाही.
तर
भीतीवर मात करणं म्हणजे धैर्य आहे.
 

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज  दि ०६/१०/२०१३

आमच्यासाठी दिन रात झटणाऱ्या सैनिकांच्या स्मरणात.


जे वाचलं ते माझ्या मनाला भावलं आणि आपल्या समोर मांडलं.
  
(Captain) शहीद विक्रम बात्रा
(9 September 19747 July 1999) was an officer of the Indian Army
१९९९ ला कारगिल युद्धात शहीद झालेला वय वर्ष २५ असलेला हा जवान, परमवीर चक्र विजेता आहे. यांच्याबद्दल वाचतांना शहीद विक्रम बात्रा यांच्या आईने खूप सुंदर, काळजाला बोचणारं, हृदयाला जखम करणारं आणि डोळ्यातून अश्रू सांडणारं बोल बोलले ते म्हणजे...

"इस देश को मैने मेरा बच्चा कुर्बान कर दिया है
कमसे कम आप इस देश से प्यार तो करो........"

हे वाक्य वाचलं आणि अश्रूंना डोह फुटला, अश्रू अनावर झाले.

तसेच लदाख पासून काही अंतरावर सिआचीन सीमारेषा आहे. कधीतरी सिआचीन सीमारेषाबद्दल वाचा आपल्याला कळेल कि, आमचे जवान (सैनिक) किती कठीण परीस्थितीत, देशावर आयुष्य ओवाळून, कुटुंबाचा स्वार्थ न पाहता, पोटच्या मुलाबाळांची पर्वा न करता, दिवस रात्र डोळे ठीजे परीयंत आणि रक्ताचं पाणी होईपरीयंत स्वतःच संवरक्षण विसरून आमच्या संवरक्षणासाठी स्वतःच्या खांद्यावर बंदुकीचा भार उचलतात.

सिआचीन सीमारेषाला जगातली सगळ्यात उंच आणि थंड वातावरण असलेली सीमारेषा मानली जाते. हि सीमारेषा समुद्रसपाटीपासून २०,००० फुट उंच आहे. सिआचीन सीमारेषावर नेहमी -४५ ते -६० डिग्री सेल्सिअस तापमान असतं. जवानांना नेहमी -४५ डिग्री सेल्सिअस वातावरणात राहावे लागते. असल्या अति थंड वातावरणात अन्नाचा घास सुद्धा पोटात उतरत नाही. तीन तीन महिने आमचा जवान अंघोळ करत नाही इतका गारठा असतो त्या सीमारेषेवर. ज्या वेळी आमचा जवान सिआचीन सीमारेषेवर आमच्या संवरक्षणासाठी उभा ठाकतो आणि ज्या वेळी त्या सीमारेषेवरून खाली परततो त्या वेळी त्याचे २० किलो वजन कमी झालेले असते. तो त्या सीमारेषेवरून जिवंत खाली परतेलच याची सुद्धा खात्री नसते.

हे सर्व वाचल्यावर आणि ह्या सर्व घटनेचे चित्रण पाहिल्यावर मनात विचार आला कि, आज आम्ही गुण्या गोविंदाने आमचा दिनक्रम सुरळीत पार पाडतो. आमची हौस मौज करत दिवस आनंदाने संपवतो. आमचे सणवार आम्ही मोठ्या उत्सहाने साजरे करतो. पण हे सर्व केवळ आमच्या जवानांच्या उपकरामुळेच साध्य होऊ शकते हे मात्र आम्ही विसरतो.  
  
उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना, युवा पिढीला असल्या गोष्टींची व आमच्यासाठी दिन रात झटणाऱ्या सैनिकांची जाणीव जरी झाली तरी खूप आहे पण हि जाणीव होणे महत्वाचे आहे. 
पण आज आम्ही व आमची युवापिढी राजकारण, जातिवाद, आणि धर्मवाद असल्या निरर्थक वादाच्या डोहात बुडाले आहेत. 

शेवटचे सांगतो माणसातला माणूस हरवला कि तो धर्म आणि जात याला जास्त महत्व देतो म्हणून सांगतो आपल्यातला माणूस हरू देऊ नका तर त्याला जिवंत ठेवा आणि माणुसकी जपा व माणसाला आणि त्याच्या कार्याला महत्व द्या.

जय जिजाऊ
जय शिवराय 
 
शिव-अर्पण मनोज  दि ०६/१०/२०१३