Wednesday, 12 February 2014

जीवनात माणूस कमावणे शिका व माणूस कमवा

जीवनात येतांना आपण काही घेऊन आलो नव्हतो व जातांना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीये. तर सर्व काही इथेच सोडून जाणार आहोत हे समीकरण आमच्या डोक्यात फिट असतांनाही काही लोकं श्रीमंतीचा तोरा आयुष्यभर मिरवीत असतात. शिवाय श्रीमंतीच्या जोरावर एखाद्या माणसावर अधिकार गाजवत असतात. श्रीमंतीच्या पुढे माणसाची किंमत शून्य ठरवणारे हे लोक असतात.

फक्त पैशाच्याच मागे धाऊ नका व पैसाच कमाऊ नका तर जीवनात माणूस कमावणे शिका. माणूस कमवा, कधीतरी माणसाला महत्व द्या. कारण पावलोपावली मृत्यू लिहिलेला आहे कधी येईल याची खात्री नाही व मृत्यू आला कि पैसा नाही तर माणसं धावून येतात. 

.. मनोज गुजर 

No comments:

Post a Comment